राऊतांचं आव्हान राणेंनी स्विकारलं, म्हणाले… ‘एक दिवस मी…’

मुंबई : संजय राऊतने सांगावं तो जिथे बोलवेल तिथे मी पोहोचतो प्रोटेक्शन पण सोडतो आणि तिथे भेटतो. सकाळपासून एकच काम नुसते टीका शिवसेनेचे कोणतेही नेते असो फक्त टीका करण्याचे काम करतात. अडीच वर्षांमध्ये यांनी केलेले एखादं काम सांगावं आदिवासी विभागामध्ये रोजगार मिळवून दिलेला दाखवून द्यावा. संजय राऊत हा आजच्या राजकारणात जोकर आहे. रामाच कार्य असताना […]

Untitled Design (15)

Untitled Design (15)

मुंबई : संजय राऊतने सांगावं तो जिथे बोलवेल तिथे मी पोहोचतो प्रोटेक्शन पण सोडतो आणि तिथे भेटतो. सकाळपासून एकच काम नुसते टीका शिवसेनेचे कोणतेही नेते असो फक्त टीका करण्याचे काम करतात. अडीच वर्षांमध्ये यांनी केलेले एखादं काम सांगावं आदिवासी विभागामध्ये रोजगार मिळवून दिलेला दाखवून द्यावा.

संजय राऊत हा आजच्या राजकारणात जोकर आहे. रामाच कार्य असताना रावणाचं नाव कशाला काढता. मी राज्यामध्ये उद्योग वाढवण्याचे काम करत आहे. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे त्याचं कारण म्हणजे मी संसदेत असताना माझ्या बाजूला येऊन रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत काय काय सांगायचं याबाबत त्यांची मी भेट घेऊन त्यांना सांगणार आहे. चपल्यांनी नाही मारला उध्दवने आणि रश्मीने तर मला विचारा.

हा शिवसेना वाढवणार नाही शिवसेना संपवणार आहे ज्याच्या खांद्यावरती हा हात टाकणार त्याचा खांदा गळणार समजा. सगळ्यात विषारी प्राणी आहे.
एक ना एक दिवस मी माझ्या प्रोटेक्शन सोडून संजय राऊतकडे जाणार. मी शिवसेना घडवणार आहे शिवसेना संपवणार नाही माझ्या रक्तात अजूनही शिवसेना आहे. 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना आम्ही सुरू केली आहे.

अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे. या अगोदर ‘आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्या पासुन त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगल त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे. तुम्ही गुंड,तर मी महागुंड , कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही.’ संजय राऊत यांनी नारायण राणेंवरही सडेतोड टीका केली होती.

Exit mobile version