Ranjit Singh Naik Nimbalkar:पहाटेच्या शपथविधीत अजित पवारांचा नाहक बळी गेला

सोलापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, यामध्ये अजित पवारांचा नाहक बळी गेला असे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले आगामी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात राहणार […]

Untitled Design (4)

Ajit pawar

सोलापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, यामध्ये अजित पवारांचा नाहक बळी गेला असे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले आगामी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजप खासदाराने केलं आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. शरद पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी आणि फडणवीसांशी बोलून हा शपथविधी घडून आणला होता. परंतु यामध्ये अजित पवार यांचा नाहक बळी गेला.

Kasba By Election: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, हा रडीचा डाव 

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. या बॅनरबाजीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केली. “महाराष्ट्रात मुंगेरी लाल के सपने बघणारे बरेच लोक आहेत. राजकीय स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. मात्र 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच अस्वित्वात राहणार नाही”, असं म्हणत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

Exit mobile version