Ravindra Chavan On Mahayuti : राज्यात सुरु असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे. कोकणात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी थेट लढत पाहायला मिळत असल्याने भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप होत आहे. यातच मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट पैसे वाटण्याचा आरोप केल्यानंतर भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खळबळजनक विधान केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भूकंप होणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जळगावमध्ये (Jalgaon) माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईल असं विधान केल्याने 2 डिसेंबरनंतर राज्यातील राजकारणात काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव येथे माध्यमांनी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या आरोपांवर प्रश्न विचारता रवींद्र चव्हाण म्हणाले की, मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर भाष्य करेन असं माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच निलेश राणे यांनी लावलेले आरोप खोटे आहेत असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
तर दुसरीकडे राज्यात सुरु असणाऱ्या फोडाफाडीच्या राजकारणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोराने सुरु आहे. या कारणावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती अशी देखील माहिती समोर आल्याने आता रवींद्र चव्हाण यांनी युतीबाबत खळबळजनक विधान केल्याने 2 डिसेंबरनंतर आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? याबाबत आता अनेक तक्रवितर्क लावण्यात येत आहे.
