Ravindra Dhangekar Answer to Sanjay Raut and Arvind Shinde : महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी शिवसेनेत काल प्रवेश केला. यानंतर धंगेकरांवर राजकीय वर्तुळातून मोठी टीका केली जातेय. संजय राऊत (Sanjay Raut) आणि अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या आरोपांना रवींद्र धंगेकर यांनी उत्तर दिलंय.
संजय राऊत आणि अरविंदे शिंदे यांच्या टीकेवर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी चुकीचं काम केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी कुठलं चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही. अरविंद शिंदे यांनी तीन निवडणुकांमध्ये माझ्याबरोबर काम (Pune Politics) केलंय. मी त्यांचे आभार मानतो. कारण त्यांच्याच ताकतीमुळे मला आमदारकी आणि खासदारकी मिळाली, असं देखील धंगेकरांनी स्पष्ट केलंय. माझी विचारधारा मानवतावादी आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.
सुरेश धसांना सहआरोपी करा; धनंजय मुंडेंचे भाऊ संतापले, किती दिवस गप्प बसणार…
मी कोणत्याही पक्षात गेलो, तरी माझी बांधिलकी ही पुणेकरांशी अन् जनतेशी आहे. जनतेच्या हितासाठी जे काही असेल, त्यासाठी आवाज मी आजही उठवणार. मी शिंदेंशी देखील बोललो, जिथे चूक असेल तिथे बोलायला मला अधिकार द्या. ते मला थांबवतील असं वाटत नाही.भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच वाईट नाहीत, सगळे चांगले देखील नाहीत. लोकशाहीमध्ये स्पर्धाही असतेच. एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय मोठे होता येत नाही, असं देखील रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत..
बोलताना धंगेकर म्हणाले की, रावसाहेब आमचे नेते आहेत. खासदार आहेत, स्नेही आहेत. माझ्या परिवारातले आहेत. ते काही बोललं तर मी वडिलांच्या नात्याने त्यांचं ऐकून घेईन. मी त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलंय. त्यांना चुकीचं वाटत असेल, तर त्यांना बोलायचा अधिकार आहे. त्यांनी तो वापरला त्याबद्दल माझ्या मनात शंका ही नाही आणि रागही नाही. मी ती जागा विकत घेतली. त्यात मी सहावा मालक आहे. मी ज्यांच्याकडून जागा विकत घेतली, तिथे सरकारी कार्यालय आहे. सरकार त्या मालकाला भाडं देते आणि त्यांच्याकडूनच मी ही जागा विकत घेतली.
गुंडगिरी! तर थेट तुमच्याशी दोन हात करू… निलेश लंकेंचं विखेंना ओपन चॅलेंज
सरकार जर त्या जागेला भाडं देत असेल, तर ही सरकारची चूक आहे की कोणाची, तुम्ही तपासून घ्या. एक प्लॉट विकत घेतला, म्हणजे ती पूर्ण जागाच वक्फ बोर्डची असं असेल तर उरलेली जागा पण वक्फ बोर्डची असायला हवी. 1960 पासून ती जागा वक्फ बोर्ड नाहीये, कोर्टाच्या परवानगीने ती जागा लिलाव झाली. त्याच्यानंतर मी पाचवा मालक आहे . आम्ही रेरा रजिस्ट्रेशनने परवानगी घेतली आहे. नॅशनल बँकेने लोन दिले आहे, तिथे आमचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक देखील त्यामध्ये मालक आहेत.मनसेचे नगरसेवक देखील मालक आहेत, मी मालक आहे. पाच ते सहा लोकांनी आम्ही ती प्रॉपर्टी विकत घेतली. त्यामध्ये बँक लोन देखील झालं आहे. तो प्लॉट मोठा आहे, त्याच्यामध्ये बँक, सरकारी कार्यालय, हॉटेल आहे. माझी चूक असेल, तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की, मी चुकीचं काम केलं नाही असं देखील रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलंय.