सुरेश धसांना सहआरोपी करा; धनंजय मुंडेंचे भाऊ संतापले, किती दिवस गप्प बसणार…

सुरेश धसांना सहआरोपी करा;  धनंजय मुंडेंचे भाऊ संतापले, किती दिवस गप्प बसणार…

Dhananjay Munde’s brother Ajay Munde press conference : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे भाऊ अजय मुंडे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यामागे त्यांनी कारण देखील स्पष्ट केलंय की, धनंजय मुंडे साहेबांच्या आई आणि भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा आरोप सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. हेच आजच्या पत्रकार परिषदेमागील कारण असल्याचं त्यांनी (Ajay Munde press conference) म्हटलंय. सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या आहेत. सनसनाटी निर्माण करायची, यासाठी असे वक्तव्य केले जात आहे.

आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींवर आरोप केले जात आहेत, किती दिवस गप्प बसणार. उगाचच आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचं काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्यामागे संपूर्ण कुटुंब आहे. दोन्ही भाऊ-बहीण मंत्री झाले, हेच विरोधकांच्या डोळ्यात खुपत (Beed Politics) आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्यांनी राजीनामा दिलाय. खरं तर परळीच्या घराचं काम सुरू आहे, त्यामुळे मुंडे यांच्या आई गावाकडे जावून राहत आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील त्या घरात राहतात.

पुनित बालन ग्रुपचा पुढाकार! ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाखांची देणगी

धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणारे हजारो मित्र आहे. आम्हाला केवळ संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्ते शांत आहेत. आम्हाला सनसनाटी निर्माण करायची नाही. सुरेश धस तरी कुठे धुतल्या तांदळाचे आहेत. त्यांचा खोक्या शंभर मोरं, हरणं कापून खातो. त्यामुळे सुरेश धस यांना सुद्धा सहआरोपी करा, अशी मागणी देखील अजय मुंडे यांनी केलीय.

दुसरा आरोप करायला काही राहिलं नाही, त्यामुळे कौटुंबिक हल्ले केले जात आहेत. कोणतारी आधार नसताना बेछुट हल्ले करायचे. नैतिक जबाबदारी म्हणून मी आज आपल्यासोबत बोलत आहे, असं देखील अजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. चार्जशीट मी पुर्णपणे वाचली नाही. आम्ही कोर्टाचा अवमान करत नाही, या प्रकरणात दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पहिल्या दिवसापासून मुंडे कुटुंबाची आहे.

धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड; हाती ‘धनुष्य’ पेलताच काँग्रेसच्या नेत्यानं उगारला ‘पंजा’

आरोप राजकीय प्रेरित आहेत. तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना हरवू शकत नाही, त्यामुळे असं बदनाम केलं जातंय. आज परळीची अशी बदनामी होत आहे, त्यामुळे वाईट वाटतंय. आरोपात कोणतंही तथ्य नाही, असं देखील अजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. सुरेश धस आरोप करून पळून जातात, अशी टीका देखील त्यांनी केलीय. माझ्या कुटुंबावर चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहे. माझ्या मनाला पटलं नाही, त्यामुळे मी आपल्यासमोर आज आलोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube