Download App

Ravindra Dhangekar : धंगेकरांचे काय आहे बारामती कनेक्शन? वाचा सविस्तर

पुणे :  कसबा( Kasaba )   पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवजणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.

रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी धंगेकर व पवार यांच्यामधील एक वेगळाच पैलू समोर आला आहे. या भेटीत शरद पवारांनी बारामतीचा उल्लेख केला होता. यावर धंगेकर यांनी त्यांचे व बारामतीचे काय नाते आहे ते सांगितले आहे.

राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

माझे आजोळ बारामती आहे. माझा संपूर्ण परिवार हा त्यांच्याबरोबर काम करतो. २००९ साली मी मनसेकडून निवडणूक लढवली. तेव्हा काँग्रेसकडून रोहित टिळक उभे होते. राष्ट्रवादीकडून दीपक मानकर उभे होते. तर भाजपकडून गिरीश बापट उभे होते. पण त्यावेळी माझ्या आईने घडाळ्याला मत दिले होते. त्यामुळे पवारांचे प्रेम आधीपासून आमच्या कुटूंबात आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.

माझे गाव देखील बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी माझे नातेवाईक जोडले गेलेले आहेत. त्यांच्या जडणघडणीमध्ये आमच्या समाजाचे त्यांच्याबरोबर काम आहे, अशा शब्दात धंगेकर यांनी बारामतीशी त्यांचे असलेले नाते सांगितले.

अजितदादांचा शब्द, ‘सभागृहात आवाज उठवणार’; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा गड असलेल्या कसबा विधानसभा क्षेत्रात विजय मिळवला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपकडे होता. याठिकाणी धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. यानंतर राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले आहेत, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले आहे.

Tags

follow us