Download App

चुकीच्या प्रकरणात मला गोवले, मी जड अंत:करणानेच पक्ष बदलला, नियतीने ही वेळ…; वायकरांचा खुलासा

माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

Ravindra Waikar News : काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेले आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मोठा खुलासा केला. चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानं गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे उरले होते. जड अंत:करणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो; शरद पवारांच्या आमदाराला अजितदादांचं चॅलेंज 

एका माध्ममसंस्थेशी बोलतांना वायकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून माझ्या हातावर शिवबंधन आणि खांद्यावरचे शिवधनुष्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्ष राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. पण, नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला. व नियतीच बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिलं.

केवळ आपली बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठीच पवारांचे विलीनकरणाचे वक्तव्य; पृथ्वीराज चव्हाण थेटच बोलले 

पुढं वायकर म्हणाले, चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे उरले होते. जड अंत:करणानेच मी पक्ष बदलला. दबाव तर होताच, पण जेव्हा पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर तेव्हा माझ्यापुढं पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असं वायकर म्हणाले.

केवळ आपली बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठीच पवारांचे विलीनकरणाचे वक्तव्य; पृथ्वीराज चव्हाण थेटच बोलले 

वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेले, असं वक्तव्य केल्यानं ते मनाने ठाकरेंसोबत आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळं रवींद्र वायकर किती उत्साहाने लोकसभा निवडणूक लढवणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

Sunil Tatkare on Ajit Pawar : बारामतीचा आढावा अन् सुनील तटकरेंनी ठोकला दावा | LetsUpp Marathi

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांना भाजप आणि शिंदे गटात सामील होण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधक अनेकदा करतात. अशातच वायकर यांनी केवळ दबावामुळेच शिंदे गटात प्रवेश केल्याचं कबुल केलं. त्यामुळं एकनाथ शिंदेंची गोची होऊ शकते.

follow us