Cockroach Janata Party : सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या झुरळ जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) जाळ्यात आता बॉलिवूड स्टारदेखील अडकल्याचं चित्र दिसून येत आहे. बॉलिवूड जगतातील निर्माते अनुराग कश्यप, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कोंकणा सेना शर्मा, ईशा गुप्ता यांच्यासह अली गोनी यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी झुरळ जनता पार्टीच्या पेजला फॉलो केलंय. खरंतर हा इंटरनेटवर उदयास आलेला भारतातील एक नवीन राजकीय पक्ष आहे. याच पक्षाच्या इंन्स्टाग्राम पेजला बॉलिवूड क्षेत्रातील अनेक कलाकारांनी फॉलो केलंय. याची चर्चा सध्या सुरु आहे.
डिजिटल जगात काहीही व्हायरल होऊ शकत. सोशल मीडियावर ‘झुरळ जनता पार्टी’ नावाच्या एका नवीन ‘राजकीय पक्षा’ची मोठ्या प्रमाणावर चर्चा जोरदार सुरु आहे. अनेकांना वाटतयं की हा एक राजकीय पक्ष आहे परंतू अद्याप तरी हा कुठला राजकीय पक्ष नाही तर सोशल मीडियावर सुरु असलेला हा ट्रेंड आहे. झुरळ जनता पार्टीच्या पेजला आत्तापर्यंत तब्ब्ल 20 दशलक्षपेक्षाही अधिक फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे उर्फी जावेद, उमर रियाझ, हिमांशी खुराना, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि प्रसिद्ध यूट्यूबर पूर्व झा हे देखील या मजेदार ट्रेंडचा उघडपणे आनंद घेत आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या जागी कोण? राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या निवडणुकीची तारीख जाहीर
या अनोख्या पेजच्या स्थापनेमागे एक तीव्र सामाजिक आणि राजकीय व्यंग असून एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांबद्दल सरन्यायाधीशांनी टीका केल्याने अभिजीत दीपके नावाच्या एका व्यक्तीने तरुणांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आणि सध्याच्या व्यवस्थेवर टीका करण्यासाठी विनोदी पद्धतीने ‘झुरळ जनता पार्टी’ची स्थापना केलीयं. अल्पावधीतच ही देशातील सर्वात मोठी ऑनलाइन चळवळ बनलीय.
सध्या इंटरनेटवर झुरळ जनता पक्षाचा जाहीरनामा सर्वाधिक शेअर केला जाणारा मजकूर बनला आहे. हा काल्पनिक पक्ष स्वतःला अधिकृतपणे ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी’ घोषित करीत आहे. त्यांच्या पोस्टमध्ये आजच्या तरुणाईचे दैनंदिन जीवन, आळस आणि करिअरमधील ताण यांची राजकारणाशी अशा विनोदी पद्धतीने सांगड घातली जातं आहे की, लोकांना हसू आवरवत नाही.
भाविकांवर काळाचा घाला; नैनितालमध्ये 100 फूट खोल दरीत कार कोसळून लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू
हे पेज आजच्या तरुण पिढीसाठी एक नवीन आदर्श बनले असून इंस्टाग्राम रिल्स आणि मीम्सच्या माध्यमातून, तरुण लोकं स्वतःला या काल्पनिक पक्षाचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’, ‘महासचिव’, ‘मुख्य प्रवक्ते’ घोषित करुन मजेदार व्हिडिओ, ग्राफिक्स तयार करीत आहेत. एकंदरीत, ‘झुरळ जनता पक्षाने’ सिद्ध केलंय की, सोशल मीडियाच्या युगात अगदी गंभीर मुद्देसुद्धा लाखो लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवता येतात.
