Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका केली. शरद पवारांना टोमणे मारण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवारांवर टीका टिप्पण्या करत कधी त्याचं वय काढलं, तर कधी निवृत्त होण्याचे सल्ले दिले. अलीकडेच अजित पवारांनी शरद पवारांचे वय झालंय, त्यांनी आता भजन-किर्तन करावं, अशी टीका केली. त्या टीकेला आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मोठी बातमी : MPSC च्या परीक्षा लांबणीवर; तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड
वय नाही तर जिद्द महत्त्वाची असते, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो, अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला.
वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो..
पैलवान कधीच म्हातारा होत नसतो..💪राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात… pic.twitter.com/EmbVHhXyxL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
रोहित पवार यांनी एक व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला. त्यात एक म्हातारा एका तरुणाशी कुस्ती खेळतांना दिसत आहे. रोहित यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, वय नाही तर जिद्द महत्त्वाची असते, हेच व्हॉट्सॲपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही, असा प्रश्न विचारायचा नसतो… पैलवान कधीच म्हातारा होत नसतो… राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तीगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे…. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोळळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते, असंही रोहित पवार म्हणाले.
Mirzapur 3: मुन्ना भैया ‘मिर्झापूर 3’ मध्ये दिसणार नाही, कारण आलं समोर
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे याही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशातच १४ मार्च रोजी अजित पवार यांनी बारामतीत सभा घेतली. या सभेत त्यांनी काका शरद पवार यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. प्रत्येकाचा एक काळ असतो… उमेदीच्या काळातच कामे होत असतात… विकास फक्त मीच करू शकतो. उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावं, असा टोला अजित पवारांनी लगावला.