Rohit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपले दौरे सुरू केले. दरम्यान, आज भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे कर्जतमध्ये होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवारही कर्जतमध्ये आले होते. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजितदादा गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असं ते म्हणाले.
कसारा घाटात भीषण अपघात, वाहन दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू
आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आज योगायोग म्हणजे, आमदार नितेश राणेही कर्जतमध्ये आहेत आणि जय पवार देखील कर्जतमध्ये आहेत. कुठंतरी सामाजिक वातावरण गढूळ कऱण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्या अनुषंगाने जर नितेश राणे कर्जत शहरात येत असतील आणि त्यावेळी जय पवारही येत असतील तर मग असं म्हणावं लागले की, भाजप आणि अजितदादा गट या दोघांनी आता रोहित पवार मतदारसंघातून बाहेर गेले नाही पाहिजेत आणि मतदारसंघाध्ये अडकून पडले पाहिजेत, असा निर्णय घेतला.
पुढं ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अजितदादा बोलत असताना काही कार्यकर्ते त्यांना भेटले आणि दादा आता तुम्ही थांबा जय पवारांना संधी द्या म्हणाले. तर कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल, असं दादा बोलून गेले. दोन दिवसांनी जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत- जामखेडमध्ये फिरायला लागले. त्यामुळं त्यांच्यामध्ये कंफ्युजन दिसंतय, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
तुम्हाला वरळीतून जायचं, गुवाहाटीला जातांना ठाकरेंनी धमक्या दिल्या…; CM शिंदेंचा खळबळजनक आरोप….
अनेक वर्षामध्ये राजकारणामध्ये काय केलं?
जयची चर्चा बारामतीमध्ये सुरू झाल्यानंतर अचानक दोन दिवसांनी जय पवार कर्जत जामखेडमध्ये येत आहेत. डिझाईन बॉक्स नावाच्या एजन्सीला 200 कोटी रुपये दिले आहेत, ते जरा गंडलेलं दिसतय. कारण, दादांची वक्तव्य सुद्धा चुकायला लागले. दादा निर्णयाच्या बाबतीतही सुद्धा चुकायला लागलं. त्याच्याबद्दल आपण काय बोलणार ? एखादी एजन्सी सांगेल तसा पण ऐकायला गेलो तर गेल्या अनेक वर्षामध्ये राजकारणामध्ये आपण काय केला असा सवाल सामान्य लोक विचारू लागले आहेत.
भाजप अजितदादांची ताकद कमी करतय…
एखाद्या लोकनेत्याला संपवायचं असेल तर भाजकडून शिकावं. भाजप कधीही लोकनेत्याला जवळ ठेवत नाही. आम्ही म्हणायचो, अजितदादा लोकनेते आहेत आणि हळूहळू भाजप त्यांची ताकद कमी करेल. आता तसंच होतांना दिसतंय, असं रोहित पवार म्हणाले.