Rohit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेत्यांनी सातत्याने शरद पवारांवर निशाणा साधला. खुद्द अजित पवारांनीही अनेकदा बोचरी टीका केली होती. शरद पवारांचं वय झालं, त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे, असं सल्ले त्यांनी दिले होते. यावरूनच आता आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar ) अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. विश्रांती घ्या म्हणणाऱ्यांनी पवार साहेबांनीच विश्रांती दिली, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.
Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द
शरद पवार गटाचा आज 25 वा वर्धापन दिन नगरमध्ये होत आहे. या मेळाव्यात बोलतांना रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. रोहित पवार म्हणाले की, मी राजकारणा व्यतिरिक्त अनेक क्षेत्रात काम करतो. पण, जेव्हा मला अडचण येते, भोवताली अंधार वाटतो, तेव्हा मी शरद पवारांचा चेहरा आठवतो आणि मला एक वेगळी उर्जा मिळते. लोकसभेला महाविकास आघाडीचा जो विजय झाला, तो इथं बसलेल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळं आणि शरद पवारांमुळं झाल्याचं रोहित पवार म्हणाले.
NDA सरकार 5 वर्ष टिकेल, मंत्रिपदावरून मतभेद नाहीत, येत्या जुलैपर्यंत… ; अजितदादा स्पष्टच बोलले
आपले दहापैकी आठ खासदार आपले निवडून आले. तर दोघे जिद्दीने लढले. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. आपला स्टाईक रेट 8 चा आहे. तर नकली राष्ट्रवादीचा स्टाईट रेट 25 टक्के आहे आणि भाजपचा स्टराईक रेट 34 टक्के आहे. पलीकडे पैसा, सत्ता, दबावतंत्र होतं, तरीही लोकांनी त्यांना नाकारून आपल्याला पंसती दिली. हे लोकसभेचं यश मस्तकातं गेलं नाही पाहिजे. कारण, आता आपल्याला लोकांच्या हिताासाठी विधानसभाही लढायची आहे, असं रोहित पवार म्हणाले.
आपण सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर बोलत होतो. तर भाजप धर्मावर बोलत होतं. शरद पवार कांद्यावर बोलत होते, तर मोदी धर्म, हिंदु-मुस्लिमवर बोलत होते,अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
लोकसभा हा फक्त ट्रेलर
ते म्हणाले, आपल्यातून तिकडे गेलेल्यांनी शरद पवांवर टीका केली. विश्रांती घ्या, असे सल्ले दिले. मात्र, त्यांच्यातल्याच काही जणांना पवार साहेबांनी लोकसभेला झोपवलं. उरलेल्यांना पवार साहेब विधानसभेत विश्रांती देतील. लोकसभा हा फक्त ट्रेलर होता. येणारी विधानसभा पिक्चर असेल. त्यावेळी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हद्दपार होतील, असा इशाराही रोहित पारांनी दिला.
शरद पवार व्यक्ती नव्हे विचार…
रोहित पवार म्हणाले, केवळ शेतकरीच नाही तर युवा, विद्यार्थी, महिलांवर संकट येतं, तेव्हा ते आशेने पवार साहेबांकडे पाहतात. शरद पवार ही फक्त व्यक्ती नाही, तर ते एक विचार आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.