Download App

एवढ्या कुरापती करुन यश नसल्यानं सर्व्हे पाहून झोप उडाली; रोहित पवारांचा अजिदादांवर घणाघात

Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड करुन मंत्रिपदाची शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या आठ नवीन मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज शरद पवार वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असल्याचे समजताच अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.(Rohit Pawar criticize on ajit pawar group meet sharad pawar yb chavan center media survey tweet ncp)

भेटीला गेलेल्या भुजबळांनी शरद पवारांचे थेट पायच धरले, म्हणाले…

आमदार रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, एका माध्यमसमूहाच्या कालच्या सर्व्हेने महाराष्ट्राच्या जनतेचा मूड दाखवून दिला आहे. एकदा नाहीतर दोन वेळा एवढ्या कुरापती करुनही अपेक्षित असा परिणाम मिळत नसल्याने हा सर्व्हे बघून काहींची झोप मात्र नक्कीच उडाली असणार.

जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे. सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच या सर्व्हेतून अधोरेखित झालं. येणाऱ्या निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार रोहित पवार यांनी लगवला आहे.

‘आता काँग्रेसचा नंबर, त्यांचे घरही लवकरच फुटणार’; शिंदे गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. आता त्यावर आमदार रोहित पवार यांनी या राजकीय घडामोडींवर खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट रोहित पवारांच्या या ट्वीटला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

अजित पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार आमचे दैवत असून आम्ही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे म्हटले आहे. आम्ही सर्वांनी त्यांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच पण, पक्ष एकसंघ राहू शकतो, त्यासाठीही योग्य विचार करावा आणि आागामी काळात आम्हाला मार्गदर्शन करावे. पवार साहेबांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पण, यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असेही यावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल म्हणाले.

Tags

follow us