‘आता काँग्रेसचा नंबर, त्यांचे घरही लवकरच फुटणार’; शिंदे गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

‘आता काँग्रेसचा नंबर, त्यांचे घरही लवकरच फुटणार’; शिंदे गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. आणखी एक पक्ष लवकरच फुटणार आहे, तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचे घर फुटणार आहे, हे मी वारंवार सांगतोय. आता त्यांच्याकडचं कोण कोण येतंय? याकडेच आमचे लक्ष आहे, असे खळबळजनक विधान शिरसाट यांनी केले आहे.

‘पवार साहेबांना भेटले, ‘त्यांनी’ दिलगिरी व्यक्त केली’; जयंत पाटील यांनी सांगितली भेटीची इनसाइड स्टोरी

उद्यापासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस आधीच हे वक्तव्य आल्याने अनेक तर्क लावले जात आहेत. काही आमदार, नेते, सरकारमध्ये आले तरी आम्हाला काही अडचण नाही, नाराजीही नाही. आमच्या सगळ्यांची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली आहे, असे शिरसाट म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसला तरी आज ना उद्या तो होणारच आहे. अधिवेशन झाल्यानंतर आणखी 14 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा दावा शिरसाट यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एक गट जरी आला तरी त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. सरकारचे काम आणि धोरणं ज्या कोणत्या पक्षाला पटतील आणि ते जर सरकारमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्या सर्वांचे स्वागतच केले जाईल. मग आम्हाला काही मिळाले नाही तरी चालेल, असे शिरसाट म्हणाले.

भाजपविरोधात ‘आप’ला कॉंग्रेसचा हात; केंद्र सरकारच्या त्या अध्यादेशाला दर्शवला विरोध

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube