Download App

सत्तेचा अहंकार सोडा, तलाठी भरतीवरुन रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. सत्तेचा अहंकार सोडा आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर (Social media)एक पोस्ट लिहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज; विखेंचा हल्लाबोल

तलाठी भरती परीक्षेत एका परीक्षार्थीला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यभरात या भरती प्रक्रियेबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळा झाल्याचे पुरावे द्या असं प्रत्युत्तर दिलं.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आदरणीय फडणवीस साहेब, तलाठी भरतीबाबत तुमची प्रतिक्रिया बघता, तुमचं सरकार राज्यातल्या युवा वर्गाबाबत अजिबात SERIOUS दिसत नाही. पुरावे मागण्याआधी तुमच्याच अखत्यारीत असलेल्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून पेपरफुटीसंदर्भात किती FIR झाल्या आणि त्यावर काय कारवाई झाली? याची एकदा माहिती घ्या, असाही सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवारांनी म्हटलंय की, पावसाळी अधिवेशनात आम्ही हा विषय मांडला असता त्यावेळेस स्वतः पोलिसांनी दाखल केलेली FIR COPY आपणास देऊनही आपण हक्कभंगाची भाषा केली होती. तीच FIR COPY आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे.

ही FIR एकदा गांभिर्याने वाचा, जर तुम्ही त्याबद्दल गंभीर असाल तर ही FIR वाचल्यानंतर तुम्ही पुरावे मागणार नाहीत, असा विश्वास आहे. तरीही तुमचं समाधान होत नसेल तर अजून गाडीभर पुरावे आम्ही तुम्हाला देऊ! पण कृपया सत्तेचा अहंकार सोडा आणि दोषींवर कारवाई करुन वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्या, अशी विनंती यावेळी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

follow us