Rohit Pawar on Ajit Pawar Controversial Statement : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य ( Controversial Statement ) केलं होतं. त्यावरून आता आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांवर तोफ डागली.
अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? #मलिदा_गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागेल!… pic.twitter.com/q2y6WA583z
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2024
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर किती कर्ज?; उमेदवारी अर्जातून समोर आली एकूण संपत्ती
जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागले! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
रोहित पवारांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, अजितदादांनी सभेत भाषण करतांना निधीबाबत वक्तव्य केल्याचे समोर आले. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? #मलिदा_गॅंगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागले! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!
Ulajh Teaser: जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित
काय म्हणाले अजित पवार?
लागेल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असं वादग्रस्त विधान अजित पवारांनी मतदार संघासाठी निधी देण्याबाबत केलं आहे. ते इंदापूर तालुक्यातील एका ठिकाणी प्रचार सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.