श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर किती कर्ज?; उमेदवारी अर्जातून समोर आली एकूण संपत्ती

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर किती कर्ज?; उमेदवारी अर्जातून समोर आली एकूण संपत्ती

Chhatrapati Shahu Maharaj Wealth declared in election : निवडणुका ( election ) म्हटलं की, पक्ष, जाहिरनामे, जंगी प्रचार सभा, तोला-मोलाचे उमेदवार आणि मतदारांना उत्सुकता असते ती उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना जाहिर कराव्या लागणाऱ्या संपत्तीची. ( Wealth declared ) त्यातून लोकांना आपल्या भावी लोकप्रतिनिधीकडे एकुण संपत्ती किती? कर्ज कीती? किंवा गेल्या वेळीच्या तुलनेत त्यात कीती वाढ झाली?

Ulajh  Teaser: जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

आता अशाच एका उमेदवाराची संपत्ती उमेदवारी अर्ज भरताना समोर आली आहे. हे कोणी सर्व सामान्य उमेदवार नाही तर ते कोल्हापूर राज घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती ( Chhatrapati Shahu Maharaj ) आहेत. जे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार आहेत. चला तर जाणून घेऊ शाहू महाराजांची संपत्ती आहे तरी कीती?

T20 World Cup साठी रोहित-विराज सज्ज! बीसीसीआयच्या बैठकीत ओपनिंग धुरा दोघांच्या खांद्यावर

श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्तीची माहिती दिली. त्यानुसार त्यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 8 हजार रूपयांची संपत्ती आहे. यामध्ये 147 कोटी 64 लाख 49 हजारांची जंगम मालमत्ता आहे. तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे.

”माढ्यात पवार पॅटर्नची हवा, विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण”

त्यापैकी 17 कोटी 35 लाख जंगम आणि 23 कोटी 71 लाख स्थावर मालमत्ता आहे. तसेच या विवरण पत्रात कर्जाची देखील माहिती द्यावी लागते. त्यानुसार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या संपत्तीमध्ये समावेश असलेल्या गोष्टींबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे आणि 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. तर 6 कोटींची वाहनं त्यांच्या नावावर आहेत. 122 कोटी 88 लाखांची शेतजमीन आहे. पत्नीच्या नावार देखील 7 कोटी 52 लाखांची शेतजमीन आहे.

वसंत मोरेंना PM व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंचा खोचक टोला

दुसरीकडे राज घराण्याचे वारसदार असलेले शाहू महारांजांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार असलेले संजय मंडलिक हे देखील कोट्यधीश आहेत. त्यांची संपत्ती 14 कोटींची आहे. त्यामुळे एकीकडे राज घराण्याचे वारसदार आणि दुसरीकडे विद्यमान खासदार अशी लढत असल्याने कोल्हापूर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पक्षात फुट, आवडता नेता अन् सध्याचं राजकारण; मकरंद अनासपुरेंकडून चिरफाड

तसेच मराठा साम्राज्याच्या कोल्हापूर गादीचे वारसदार असल्याने लोकांच्या शाहू महाराजांबद्दल आदराच्या भावना आहेत. त्यामुळे नुकतेच प्रचारा दरम्यान जेव्हा महायुतीच्या मंडलिकांकडून करण्यात आलेल्या शाहू महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून सर्वच स्तरावरून टीका झाली. मंडलिकांनी शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार असण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना त्याबद्दल माफी देखील मागावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडीला त्यांच्या याच प्रतिमेचा ही निवडणूक जिंकण्यात कितपत फायदा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube