नितीन गडकरींच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ, गडकरींची संपत्ती तरी किती?

नितीन गडकरींच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ, गडकरींची संपत्ती तरी किती?

Nitin Gadkari wealth : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीये. काहीच दिवसांपूर्वी भाजपने महाराष्ट्रातून २० उमेदवारांची नावं लोकसभेची उमदेवारी दिलीये. त्यात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) नागपूरमधून उमेदवारी दिलीये. त्यानंतर 27 मार्च रोजी गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, मोदी सरकारमध्ये नेहमीच कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या गडकरींची संपत्ती (Nitin Gadkari wealth) तरी किती? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. आता आता त्याच विषयी जाणून घेऊ.

Prakash Ambedkar : राऊतांवर निशाणा पण मविआसोबत चर्चा बंद नाही; आंबेडकरांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला 

गडकरी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत पाच दहा टक्कांनी नाही तर तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 मध्ये गडकरींची संपत्ती 10.27 कोटी रुपये होती. ती आता 15.52 कोटींवर इतकी झाली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2019 मध्ये गडकरींकडे 8 कोटी 65 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती. आता त्या स्वावर मालमत्तेचे मूल्य हे 12 कोटी 94 लाख 83 हजार रुपये इतकं आहे. स्थावर मालमत्तेत गडकरींच्या पत्नीच्या नावावर नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथं 15.74 एकर जमीन आहे. याशिवाय वरळीत एक फ्लॅट असून, त्याची सध्याची बाजार किंमत 4 कोटी 95 लाख रुपये आहे. एकट्या नितीन गडकरी यांच्याकडे एकूण 6 कोटी 27 लाख 90 हजार 605 रुपयांची एकूण स्थूल आणि स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 9 कोटी 24 लाख 69 हजार 441 रुपयांची एकूण स्थूल आणि स्थावर मालमत्ता आहे.

Nora Fatehi : डान्सर नोरा फतेहीच्या स्टाईलीश अंदाजने वेधले चाहत्यांचं लक्ष 

तर चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपचे उमदेवार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुनगंटीवार यांची 6.57 कोटींची संपत्ती 11 कोटी 31 लाखांवर पोहोचली आहे. मुनगंटीवार दाम्पत्याकडे 2019 मध्ये 6 कोटी 57 लाख रुपयांची संपत्ती होती. 2024 मध्ये त्यात 4 कोटी 73 लाख रुपयांची वाढ झाली. मुनगंटीवार यांच्या नावावर 2029 मध्ये 73 लाख 68 हजार 81 रुपयांची स्थूल आणि 4 कोटी 69 लाख 97 हजार 125 रुपयांची स्थावर अशी एकूण 5 कोटी 43 लाख 65 हजार 206 रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 13 लाख 78 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आता दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ मुनगंटीवार यांच्याकडे 94 लाख 68 हजार 229 रुपयांची स्थूल तर 8 कोटी 49 लाख 96 हजार 853 रुपयांची मालमत्ता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज