Sanjay Rathod : मुंबईतील मंत्रालयाच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित करणारी घटना समोर आलीयं. मृद व जलंसधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल 80 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आलीयं. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून या घटनेने प्रशाकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीयं.
राज्यात अनेक ठिकाणी चोरींच्या घटना घडत असतात. मात्र या चोरीच्या घटनेनंतर आता मंत्रालयातील नियमांवरुन प्रशासकीय चर्चा रंगूलागल्या आहेत. मंत्रालयात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम घेऊन जाण्यास मनाई आहे. यासंदर्भातील तपासणी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच घेतली जाते. याबाबतच्या सर्व सूचना प्रशासनाकडून दिल्या जातात. तरीही मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजारांची रक्कम आली कुठून असाही सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज; CM फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय, दोन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी
मंत्रालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानादेखील मंत्रालयाच्या कार्यालयात चोरी झालेली आहे. या घटनेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार करण्यात आलेली नसून गुन्ह दाखल न करताच पोलिसांकडून गुप्त तपास सुरु असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
