Rupali Chakankar On Pooja Tadas : भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी यांनी आपल्या पतीसह कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत (Sushama Andhare) पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी आरोप केलेत. तर दुसरीकडे रामदास तडसांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्य महिला आयोगावर सडकून टीका केली जात आहे. या टीकांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चाकरणकरांनी यासंदर्भातील ट्विटच केलं आहे.
काल एक पत्रकार परिषद घेत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आपल्या पतीवर आणि कुटुंबावरआरोप केले आहेत.या प्रकरणी सप्टेंबर २०२१ मध्ये पूजा यांनी मला संपर्क केला,आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. तेव्हा मी तातडीने दखल घेत याबाबत कारवाई करण्याचे आदेश… pic.twitter.com/DeP4IifgBB
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 12, 2024
रुपाली चाकणकर ट्विटमध्ये म्हणाल्या, “काल एक पत्रकार परिषद घेत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आपल्या पतीवर आणि कुटुंबावर आरोप केले आहेत. या प्रकरणी सप्टेंबर २०२१ मध्ये पूजा यांनी मला संपर्क केला,आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. तेव्हा मी तातडीने दखल घेत याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक वर्धा यांना दिले होते. आयोगाने दखल घेतल्यानंतर पंकज आणि पूजा यांचा विवाह झाला. फक्त कागदोपत्री विवाह मान्य नसल्याने पूजा यांच्या मागणीप्रमाणे पुन्हा वैदिक पद्धतीने विवाह झाला. पूजा यांनी आपण आता समाधानी असल्याचे सांगितले होते,तसेच आयोगामुळे आपल्याला न्याय मिळाला असेही त्यांनी नमूद केले होते. राज्य महिला आयोगाच्यावतीने दखल घेतल्यानेच पूजा यांना काही तासात न्याय मिळाला आणि तडस कुटुंबीयांनी तिला सून म्हणून स्वीकारले होते.
स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला
कालच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या समोर आल्यानंतर मला कळलं की पूजावर पुन्हा अन्याय झाला आहे. मात्र याबाबत पूजाने महिला आयोगाकडे किंवा माझ्याकडे कुठलाही संपर्क साधला नाही.संपर्क साधला असता तर तिला याआधी केली तशीच मदत आम्ही आताही केली असती. कुठलीही तक्रार आयोगाकडे आल्यानंतर आयोग त्यावर कारवाई करतोच. मात्र याविषयी आयोगाला कुठलीही कल्पना न देता प्रसारमाध्यमातून आयोगावर बेछूट आरोप करणे निषेधार्ह” असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
काही दिवसांपूर्वी पूजा तडस प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला होता. त्यांनीच तडस यांना सोबत घेऊन सगळं काही करुन दिलं होतं. आता महिला आयोगाच्या अध्यक्षांची भाजपसोबत हातमिळवणी झाली. त्यामुळे भाजप खासदाराविरोधात त्या का बोलतील? सोशल मीडियावर त्यांना त्यांच्या प्रमाणिकपणावर बोललो तर त्यांच्यावर कारवाई करायची इतर महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग असतो काय? असा खोचक सवाल सुषमा अंंधारेंनी केला होता.