Download App

घराचे महाभारत कोणी केलं? विचारत सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंना रूपाली पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

Rupali Patil Thobare : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजय यांच्या निवडणुकीतील लढतीवरून अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thobare ) यांनी सुनेत्रा पवार यांच्या जाऊ आणि श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंच्या पुरंदरमध्ये आज धडकणार निरोपाची नोटीस

यावेळी बोलताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत पवार कुटुंबाचं एका नंदनवनाप्रमाणे घर तयार केलं. त्या घराला गोकुळासारखंच जपलं. एक सुसंस्कृत आणि घरंदाज महिला म्हणून त्यांनी कुटुंबाशी एकरूप राहून हे घर जपलं. मात्र या नंदनवनाप्रमाणे असलेल्या या घराचे महाभारत कोणी केलं? हे शर्मिला पवार यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं नाव सांगावं. कारण त्याच म्हणाल्या की, मुखात श्रीराम आणि घरात महाभारत त्यामुळे तुमच्यात धमक असेल तर ते नाव जाहीर करा. असं आव्हान रूपाली पाटील ठोंबरे यांनी शर्मिला पवार यांना दिलं आहे.

मनोज जरांगेंची लढाई ही राजकीय, अजय महाराज बारसकर यांचा गंभीर आरोप

तर या अगोदर देखील रूपाली पाटील यांनी शर्मिला पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदर गरश ओकायला लागले आहेत. आधी अजित पवार यांचे बंधू त्यानंतर त्यांच्या पत्नी शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्यांना त्रास होत असल्याने त्या असं करत असल्याचे आरोप ठोंबरे यांनी केला होता.

आणखी एक काँग्रेसीला CM शिंदे आयात करणार? संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर

दुसरीकडे लेकीने लग्न केल्यावर तिने कधी माहेरी यायचं नाही का? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सख्ख्या भावजयी शर्मिला पवार खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांच्या समर्थनात मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत होणार आहे.

महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे मैदानात उभे राहणार आहेत. बारामतीचं वातावरण तापलेलं असताना अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर माहेरवाशीणवरुन टीका केली जात होती. या टीकेला अजितदादांच्या भावजयी शर्मिला पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. बारामतीमध्ये आयोजित सभेसाठी पवार आल्या होत्या.

follow us