मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंना शिंदेकडून निरोपाचा नारळ; आज धडकणार नोटीस
मुंबई : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या विजय शिवतारेंवर (Vijay Shivtare) शिस्तभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगा कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जात असून ही नोटीस आज (दि.26) पाठवणार आहे. या कारावाईमुळे शिवतारेंना पक्षाचे आदेश न पाळणे आणि अजितदादांविरोधात दंड थोपटणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. शिवतारेंनी पक्षाचा आदेश न मानल्यास अथवा पाठवण्यात आलेल्या नोटीसीला 24 तासांच्या आता उत्तर न दिल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता नोटीस मिळाल्यानंतर शिवतारे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारामतीबाबत शिवतारेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांना दोनदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच युतीधर्म आपल्याला पाळावाच लागेल असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही आपण बारामतीमधून लढण्यावर ठाम असल्याची भूमिका शिवतारेंनी जाहीर केली होती. विजय शिवतारे यांनी २४ तासात लेखी उत्तरं नाही धीले तर शिवसेना पक्षातून हकाल पट्टी होणारं आहे. (Eknath Shinde Send Notice To Vijay Shivtare)
आणखी एक काँग्रेसीला CM शिंदे आयात करणार? संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर
बारामती काबीज करण्यासाठी थोपटेंची घेतली भेट
बारामतीमध्ये सुत्रेना पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, शिवतारेंच्या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेमुळे येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच शिवतारेंनी पवारांचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती काबीज करण्यासाठी 44 वर्ष जुना वैरी म्हणजेच अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शिवतारेंनी थोपटेंना जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी साद घातली होती. तसेच पुरंदरचे सर्व मतदार आपल्या मागे असल्याचं शिवतारेंनी यावेळी थोपटेंना सांगितलं होतं.
मी माफ केलं पण जनता…
थोपटेंच्या भेटीदरम्यान शिवतारेंनी थोपटेंना शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं याची आठवण करून दिली. एवढेच नव्हे तर, अजितदादांनी जाहीर सभेत माझी लायकी काढली. त्यामुळे हा अपमान पुरंदरच्या मतदारांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच येथील जनता आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही असे ठामपणे सांगत असल्याचे थोपटेंना शिवतारेंनी सांगितले आहे. तर, दुश्मनी राहिली बाजूला, मी यांना माफ केलं, पण जनता माफ करणार नाही हे ग्राऊंड रिअॅलिटीदेखील शिवतारेंनी थोपटेंना दाखवून देत याचसाठी मी निवडणूक लढवत आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा असल्याची साद शिवतारेंनी थोपटेंसमोर ठेवली आहे.
ठाकरेंचा अहंकार अन् मुंबईला POK म्हणणाऱ्या कंगनाला भाजपनं यासाठी दिली उमेदवारी!
…तर मी शिवसेनेतून बाहेर पडेल
काही दिवसांपूर्वी शिवतारेंवर कारवाई होणार असल्याच्या वृत्त समोर आले होते. त्यावर बोलताना शिवतारे म्हणाले होते की, माझ्यावर कारवाई होणार अशा बातम्या येत आहेत. बघू पुढे काय होते ते. काल्पनिक मुद्द्यांवर बोलणं योग्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी लोकसभा निवडणूक लढणार आणि विजयी होणार आहे. आज मी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. महायुतीत मी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर जागा सोडवून घेतली तर मला आनंद होईल, असे शिवतारे टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आमचं घनिष्ठ नातं आहे. आता दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. परंतु, महायुतीत आपल्यासाठी जागा सुटणार नाही हे देखील ठाऊक आहे. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतो. 25 वर्षांची सोबत आहे ती मात्र कायम राहणार आहे, असे विजय शिवतारे म्हणाले होते.
एका खासदाराचही तिकीट कापणं किती महागात पडू शकतं हेच हेमंत गोडसेंनी दाखवून दिलं…
अजितदादांना भिडणाऱ्या शिवतारेंची ताकद किती?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख 86 हजार तर भाजपाच्या कांचन कुल यांना पाच लाख 30 हजार मते मिळाली होती. यात पुरंदरमध्ये कांचन कुल यांना 95 हजार 191 मते होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विजय शिवतारे यांना 99 हजार 306 मते होते. म्हणजेच कुल यांच्यापेक्षाही शिवतारे यांना जास्त मते होती. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे शिवसेनेची साधारण 35 ते 40 हजार मते वजा केली तरीही स्वतः शिवतारे यांची किमान 60 ते 65 हजार मते या मतदारसंघात आहेत.