Download App

Sachin Sawant : ‘येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही’

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत ( Sachin Sawant )  यांनी ट्विट करत मोदी व रा. स्व. संघावर  निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्यावर संघाचा संस्कार व मोदी सरकारचा दबाव अधिक होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात अनेक राज्यपाल आले पण अशा पध्दतीने जनतेच्या तिरस्काराचे धनी कोणाला व्हावे लागले नाही. जनतेने नाकारल्यानंतर देखील  व कोश्यारीजींनी मागणी करुनही भाजपा त्यांना हटवत नव्हती हा महाराष्ट्राचा अनादर होता. “एक अकेला सबपे भारी” म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले, असे म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला आहे.

तसेच जनमताचा रेट्यासमोर अनेक हुकुमशाह्या कोलमडून पडल्या आहेत आणि जनतेचा रेटा वाढत चालला आहे हे लक्षात ठेवा. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार अनेक संविधानिक संस्थांचे व भाजपा नेत्यांचे नैतिक अधःपतन करवत आहे. येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही, अशी टीका सावंतानी ट्विटद्वारे केली आहे.

दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी नियुक्ती केली आहे. बैस हे सध्या झारखंड येथे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे.

Tags

follow us