Sadabhau Khot Gopichand Padalkar In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत मोठी सभा घेतली होती. त्यानंतर भाजप देखील या सभेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आज भाजप आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत ईव्हीएम समर्थनार्थ जाहीर सभा घेतली.
‘…तर कार्यक्रमाला येवूच नका’; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांवर सोनू निगमचा संताप, पाहा व्हिडिओ
याच पार्श्वभूमीवर मारकडवाडीत आज सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, गावाने इतिहास घडवला आहे. याची दखल देशाने घेतली. भारतातील सर्वात मोठा चोर राहुल बाबा इथे येणार आहे. ते अगोदर अमेरिका अन जपानमध्ये जायचे. पण त्यांना भारत नावाचा देश आहे, हे माहित नव्हतं. हा मंडप पण तसाच ठेवू, मारकडवाडी गाव हुशार आहे. बिचाऱ्याचं लग्न झालं पाहिजे. पोलिसांना विनंती करतो, बॅलेटपेपरवर निवडणूक होवू द्या, त्यांना निवडून येवू दे. त्यांचा शपथविधी पण इथेच करतो, अन लग्न पण इथेच लावतो, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) तुफान फटकेबाजी करतो.
पुन्हा शेतकरी आंदोलन, 14 डिसेंबरला दिल्लीला जाणार, शेतकरी संघटनेची घोषणा
शरद पवार लई हुशार आहेत. 50 ते 60 वर्षात पहिल्यांदा त्यांची राजकीय हत्या झालीय. गहिवर घालायला ते मारकडवाडीत लावू. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील खोचक टीका केली आहे. या गावाने लोकशाही वाचवण्याचं काम केलंय. शरद पवार यांचा पक्ष नाही तर गुंडांची टोळी आहे. ते गाडायचं काम देवाभाऊने केलं असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. बॅलेट पेपरवर मतदान झालं तर घोटाळा करता येतो, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेत सांगितलं. शरद पवार यांनी 60 ते 70 वर्षात सत्ता भोगली असल्याची टीका देखील खोत यांनी केलीय.
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेतली. त्यांनी बॅलेटवरील मतदानासाठी सुरू केलेल्या आंदोलनाने आता चांगलाच जोर धरलाय. एखादा डाव पवार साहेबांनी टाकल्यास म्हणतात की, पैलवानाने लंगोट घातला. अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो. नवं तंत्रज्ञान (ई्व्हीएम) कॉंग्रेसने आणलं. दहा वर्ष सत्ता भोगली अन् आता ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचं म्हणत आहात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीय. आंदोलन करायचं, जाती-जातींना वर काढायचं, मग तुम्ही 60 वर्ष पीठ मागत होता का? असा सवाल खोतांनी केली. पवारांची ईडा-पीडा मायमावलीने घालवली, अशी टीका देखील खोतांनी केलाय.