Sadabhau Khot : महात्मा गांधींचा ‘विचार’ अन् ‘खेडी’ नेहरूंनीच लुटली 

Sadabhau Khot : महात्मा गांधींचा ‘विचार’ अन् ‘खेडी’ नेहरूंनीच लुटली 

पुणे : अपला भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते. परंतु, पंडित नेहरू (Pandit Nehru) यांनी या विचारांचा खून करून खेड्यांची लूट केली. तसेच शहरं मोठी केली. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. खरं तर महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे (Nathuram Godse) याने केला ही बाब निषेधार्हच आहे. परंतु, महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे आपल्याला स्वीकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे आयोजित सहाव्या युवा संसदमध्ये ‘आयडिया ऑफ इंडिया’ या सत्रामध्ये  सदाभाऊ खोत बोलत होते. याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवत उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला आहे. परंतु, तेव्हा इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करत देशाची लुबाडणूक केली. अशा प्रकारची व्यवस्था कायम राहिली तर देशाच्या सर्व भागांचा, राज्यांचा समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास करण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube