Sajan Pachpute : ठाकरे गटात येताच साजन पाचपुतेंना मोठं पद, काका-पुतण्याचा संघर्ष पेटणार!

Sajan Pachpute : पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या राजकारणाने राज्याच्या राजकारण ढवळून निघालेलं असतांना आता आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातही संघर्षसुरू झाला. बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पातपुते (Sajan Patpute) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उबाठात (शिवसेना)गटात प्रवेश केला. यावेळी साजन यांची उपनेतेपदीही निवड करण्यात आली. https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80 साजन पाचतपुते यांनी काही दिवसांपूर्वी […]

Untitled Design (34)

sajan satpute

Sajan Pachpute : पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या राजकारणाने राज्याच्या राजकारण ढवळून निघालेलं असतांना आता आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातही संघर्षसुरू झाला. बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पातपुते (Sajan Patpute) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उबाठात (शिवसेना)गटात प्रवेश केला. यावेळी साजन यांची उपनेतेपदीही निवड करण्यात आली.

https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80

साजन पाचतपुते यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा सुरू असताना पाचपुते यांनी ठाकरे गटाची निवड केली. आज सायंकाळी मातोश्रीवर साजन सातपुते यांनी उबाठात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

या पक्षप्रवेशा वेळी उद्धव ठाकरे बोलतांना म्हणाले, साजन हे सहकुटूंब-सहपरिवार पक्षात आलेत. त्यामुळं शिवसेना पक्षाचा परिवार विस्तारत आहे. खरंतर आज सत्तेच्या दिशेने सर्वजण जात आहे. पण, सध्या आपल्याकडे कुठलीही सत्ता नसतांना ते सत्ता आणण्यासाठी इकडे आले आहेत.

Letsupp Special : Maratha Reservation आंदोलनाचे नवीन हिरो मनोज जरांगे; पण त्यांच्या मागण्या मान्य करण्यात या आहेत अडचणी… 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर जिल्ह्यातील काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन यांनी बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह यांचा पराभव केला होता. बहुमताने विजय मिळवत साजन यांनी स्वतंत्रपणे राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही साजन पाचपुते यांनी आमदार पाचपुते यांच्या गटाच्या विरोधात लढत दिली होती आणि ही निवडणूक जिंकूण आपलं सामर्थ्य दाखवलं होतं..

काही दिवसापूर्वी वाकचौरेंनी केला प्रवेश
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फुट पडली. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यभरात सभा घेऊन पक्षबांधणीला सुरूवात केली. दरम्यान, आता उबाठा गटात इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी काही दिवसांपूर्वी उबाठात प्रवेश केला होता. तर आता साजन पाचपुते ठाकरे गटात गेल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.

Exit mobile version