Download App

गैबी चौक महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाची जागा, समरजितसिंह घाटगेंचे मुश्रीफांना ‘चॅलेंज’

Samarjit Ghatge : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का देत समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये

  • Written By: Last Updated:

Samarjit Ghatge : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का देत समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवार यांच्या समरजितसिंह घाटगे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले की, काही मीडियाची लोकांनी मला विचारले की, तुम्ही पक्ष प्रवेशासाठी गैबी चौक का? निवडला. मी त्यांना म्हटलो की, ही जागा शरद पवार साहेबांनी निवडली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे गैरसमज होता की गैबी चौकात सभा घेण्याची जागा कोणाची तरी आहे मात्र त्यांना आठवण करून देण्यासाठी ही जागा निवडण्यात आली आहे. ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाची आहे. याची आठवण करून देण्याची आता गरज आहे म्हणून ही जागा निवडण्यात आली असं म्हणत समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लावला.

पाकिस्तानला धक्का, बांगलादेशकडून मालिका गमावली, रचला लज्जास्पद विक्रम

तर दुसरीकडे विधानसभा सभा निवडणुकीची शेवटची सभा देखील गैबी चौकातच होणार असेही यावेळी ते म्हणाले आणि या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार. याचा कारण म्हणजे गेल्यावेळी त्यांनी गैबी चौकातून माझा करेक्ट कार्यक्रम केला होता आणि यंदा याच चौकातून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. म्हणून शेवटीची सभा या चौकात होणार असं ते म्हणाले.

follow us