Sambhaji Raje : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) जोरदार तयारी सुरू केली. तर छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरू केली. त्यांचा स्वराज्य पक्ष विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. राजरत्न आंबेडकरांना (Rajaratna Ambedkar) सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दरम्यान, जरांगेंशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती लवकरच करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले.
Kangana Ranaut: ‘खान’ फॅमिलीबद्दल अभिनेत्री थेट म्हणाली, ‘सलमान जिनको खटकते है…’
आज सोलापूरमध्ये स्वराज्य पक्षाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. राजरत्न आंबेडकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये आगामी निवडणुकांविषयी एकत्र येण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
जरांगेंशी लवकरच राजकीय चर्चा
यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अद्याप झाली नसली तर आम्ही ती करणार. जरांगे यांचा दृष्टीकोण आणि माझं उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे जरांगे यांच्याशी चर्चा करायला कुठलीच अडचण नाही. छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते अंमलात आणलं होतं. त्या आरक्षणासाठीच आम्ही दोघे लढत आहोत. त्यामुळे जरागेंना माझा नेहमीच सपोर्ट राहिला आणि राहिलं. जरांगेंशी लवकरच राजकीय चर्चा देखील होईल, असे संभाजीराजे म्हणाले.
मविआसोबत जाण्याचा प्रश्नच नाही…
पुढं ते म्हणाले, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार आहे.याबाबत लवकरच बैठक होणार आहे. राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, राजरत्न आंबेडकरांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचं संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणावर काय बोलले?
संभाजीराजे म्हणाले की, आरक्षण देण्यापेक्षा आरक्षण कसं टिकेल यावर चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी दोनदा आरक्षण मिळालं पण ते टिकलं नाही. राज्यात मराठा-ओबोसी वाद होणार नाही, याची सर्वांना काळजी घ्यावी, असं ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यात मागील कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती होती. तर आज डॉ. राजरत्न आंबेडकर हे स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला हजर होते. संभाजीराजेंनी जरांगे पाटलांनाही साद घातली आहे. त्यामुळं राज्यात तिसरी आघाडी तयार होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.