Download App

तेव्हा मला लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी.., संभाजीराजेंनी ‘तो’ किस्सा रंगवूनच सांगितला…

  • Written By: Last Updated:

Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील एक चर्चेतील नाव आहे. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महारांजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज असल्यानं अनेकांना त्यांच्या विषयी उत्सुकता आहे. अनेकांना त्यांचं शिक्षण, त्यांची आवड ह्या विषयी जाणून घ्यायचं असतं. दरम्यान, आता संभाजीराजेंनी आपलं शिक्षण आणि लग्नासंदर्भातला किस्सा रंगवून सांगितला आहे. यावेळी त्यांनी मोठ्या महाराजांना लग्नाला नकार देऊ शकत नव्हतो म्हणून मला एमबीएचं शिक्षण करायचं असल्याचं सांगून लग्नाचा विषय लांबवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Sambhajiraje Chhatrapati told why they did MBA)

खास रे टीव्हा दिलेल्या मुलाखतीत त्यांना एमबीए का निवडलं? हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संभाजीराजेंनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आजपर्यंत मला हा प्रश्न कोणी विचारला नाही. खरंतर एमबीए करून मला काही फायदा झाला नाही. माझं ग्रॅज्यूएशन बीएमध्ये झालं. जेव्हा माझं ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं, तेव्हा अनेक वर्षापासून आमच्या घराण्यातील कुणाचं कोल्हापूरात लग्न झालं नव्हतं. मोठ्या महाराजांची इच्छा होती, मी एमबीए केलं तर ते परदेशात करावं. मात्र, मी कोल्हापुरच्या लाल मातीत फार रमलो होतो. मी ज्या कॉलेजात होतो, तिथं प्रामुख्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे आणि हे वातावरण मला भावलं होतं. त्यामुळं शिक्षणासाठी परदेशात जायचा प्रश्नच नव्हता. पण, त्यांना माझं लग्न मोठं करायचं होतं, आणि ते कोल्हापुरात करायचं होतं. मात्र, त्यावेळी मला लग्न करायचं नव्हतं. मोठ्या महाराजांना थेट लग्नाला नकार कसा द्यावा, ही माझ्यासमोर पंचाईत होती. त्यामुळं मग मी कोल्हापुरात दोन वर्ष एमबीए केलं. आणि मी डिस्टींकशनमध्ये पासही झाल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी… 

यावेळी बोलतांना त्यांनी त्यांच्या आवडीनिवडीही सांगितल्या. क्रिकेट आणि स्वीमींग हे माझे आवडते खेळ आहेत. मला बॉलिंग करायला आवडतं, असं त्यांनी सांगितलं. आता राजकारणातही तुम्ही विकेट घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, मी राजकारणात नवखा आहे. पण, मला टेस्ट मॅच खेळायची. वन डे मॅच नाही, असं ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणाचा चिखळ झालेला पाहून वाईट वाटतंय. ही लोकशाहीची थट्टा आहे. भाजप सेनेची युती ही नैसर्गिक युती होती. मात्र, 2019 मविआचं सरकार आलं. दोन अडीच वर्ष हे सरकार चाललं, पण काही नंतर काही आमदार फुटले आणि गोवा-गुवाहाटी करत मुंबईत आले आणि नवं सरकार स्थापन केलं. या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच, राष्ट्रवादीतही भुकंप झाला. राष्ट्रवादीचा गट केवळ 9 महिन्याच्या सत्तेसाठी सरकारमध्ये गेला. आता सत्तेतही राष्ट्रवादी अन् विरोधातही राष्ट्रवादी आहे. सत्तेत शिवसेना आणि विरोधातही शिवसेना आहे.  भाजप फक्त मजा पाहते. ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे, त्यामुळं वाईट वाटतं, असं ते म्हणाले.

 

Tags

follow us