Download App

कंत्राट देतांना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले, मलिदा खाल्ल्यानेच समृध्दीला खड्डे; वडेट्टीवांरांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाव (Samruddhi Mahamarg) आजवर अनेक अपघात झाले. आता या महार्गावर खड्डेही पडत चालले आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिदाच्या खाल्ल्यामुळेच समृद्धीला खड्डे पडले, कंत्राट देतांना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रामदासभाई एवढे का चिडले? 

आज माध्यमांशी बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या समृध्दी महामार्गाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. मोठे अपघात झाल्यावरही उपाययोजनांची गरज होती. केलेले काम घाईघाईत केले, ते निकृष्ट दर्जाचे होते, हे समोर आल आहे. तेव्हा बोंबाबोंब झाली आणि आज प्रत्यक्ष खड्डे पडल्याळं समृध्दीचा बोजवारा उडाला हे आता जनतेला कळलं.

ते म्हणाले, मागील दहा वर्षात जगातील इतर देशांनी किती प्रगती केली. आणि इकडे भाजपचं सरकार साधं रस्त्याचं काम ही चांगलं करू शकत नाही. हजारो कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या ह्या महामार्गाचे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की आज या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. निकृष्ट बांधकामामुळे अनेक अपघात समृध्दी महामार्गावर आतापर्यंत झाले आहे. समृद्धीकडून मोठ्या प्रमाणात कमिशन खाण्यात आले, कंत्राटे देताना सत्ताधाऱ्यांनी समृद्धीतून करोडो रुपये आपल्या खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

बारामतीत शरद पवार यांच्या पुन्हा करामती….. अजितदादांच्या प्लॅनला असा लावला सुरूंग! 

वडेट्टीवार म्हणाले, इतके कमिशन वसूल करून पोट भरणार ते महायुतीचे सरकार आणि मंत्री कसले? अजूनही कमिशनची भूक बाकीचं आहे. म्हणूनच समृध्दी महामार्गावर विकासाच्या नावाखाली आणखी २४०० कोटींचा कंत्राट या सरकारने काढला आहे. गाडी रुळावरून घसरू नये, यासाठी चारही बाजूने 700 किलोमीटर रस्त्यासाठी 2400 कोटी रुपयांचे टेंडर काढलं. त्यामध्ये दोन्ही बाजूने सेफ्टी वायर लावले जाणार असून याची किंमतही फार कमी आहे. मात्र, कमी किमतीची निविदा फुगवण्यात आली. विशिष्ट कंत्राटदारांना फायदा व्हावा यासाठी ही खटपड आहे. समृध्दीचा मलिदा खाल्यामुळेच खड्डे पडले आहेत, अशा कामामुळेच अनेकांचे जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला. अशा महामार्गामुळे राज्याची समृद्धी वाढण्याऐवजी लोकांचे बळी जात असल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

follow us