‘संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी’; राष्ट्रवादीतील आमदार फुटीच्या वक्तव्यावर संग्राम जगतापांचा पलटवार

Sangram Jagtap on Sanjay Raut; विलीनीकरणाबाबत बोलताना संग्राम जगताप यांनी सध्या पक्षात कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे स्पष्ट केले.

Sangram Jagtap on Sanjay Raut NCP Merger

Sangram Jagtap on Sanjay Raut NCP Merger

Sangram Jagtap on Sanjay Raut NCP Merger: अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पुन्हा फुटू शकतात, अशा आशयाचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी,’ असा टोला त्यांनी लगावला.

टीम इंडियाची ऐतिहासिक नामुष्की! न्यूझीलंडने 244 धावांनी उडवला धुव्वा, पहिल्याच षटकात सामन्याचं चित्र पालटलं

विलीनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना संग्राम जगताप यांनी सध्या पक्षात कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात कोणत्याही आमदाराला फोन आलेला नाही, निरोप मिळालेला नाही किंवा मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय पातळीवरील असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यावेळीही आमदारांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. आता दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाही आमदारांना काही विचारले जात नाही. पक्षातील महत्त्वाचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि त्यानंतर तेच अंतिम ठरतात, असेही जगताप म्हणाले.

एक चूक अन् जगभरात Microsoft ठप्प; क्लाउड आउटेजची 7 संभाव्य कारणं

दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य आमदार फुटीबाबत केलेल्या वक्तव्यावर जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. राऊत यांनी आधी आपल्या पक्षात काय सुरू आहे, याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या स्वतःच्या पक्षात कोण फुटणार होते, याचीही त्यांना माहिती नव्हती. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत असे दावे कसे करू शकतात, असा सवाल करत जगताप यांनी राऊतांवर निशाणा साधला.

Exit mobile version