Sanjay Shirsat On Aadity Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाण्यापूर्वी मातोश्रीवर येऊन रडले होते व जेलमध्ये जायचे नाही असे म्हणाले असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तोडा असेही म्हटल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सत्तांतर होण्यापूर्वी महाविकास आघाडी सोबत राहू नये ही भूमिका सर्वच आमदारांची होती. राष्ट्रवादी काँग्रेस कडून होणारा त्रास, निधी देताना होणारा भेदभाव, यामुळे सर्वच आमदार त्रस्त होते. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून चर्चा केली होती. मात्र ज्यावेळेला आम्हाला कळलं की आमच्याकडून काही होत नाही तेव्हा आम्ही गटनेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या वरिष्ठ पातळीवर आमदारांची भूमिका मांडण्याची मागणी केली होती, असे शिरसाट म्हणाले आहेत.
Shital Mhatre : ‘दोघेही, एक ही थाली के चट्टे-बट्टे…’ म्हात्रेंचा राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा
तसेच त्यावेळी शिंदे यांनी आमदारांची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. मात्र तिथे जाऊन एकनाथ शिंदे रडले अस काही झालं नाही आणि मी तिथे नसल्यामुळे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
Pankaja Munde या धनंजय मुंडेंना सोपे सोडणार नाही… परळीतूनच लढणार !
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते की भाजप सोबत गेलो नाही तर मला अटक करतील आणि यावेळी एकनाथ शिंदे रडले होते. असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. याबद्दल बोलताना संजय शिरसाठ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.