Shital Mhatre : ‘दोघेही, एक ही थाली के चट्टे-बट्टे…’ म्हात्रेंचा राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा
Shital Mhatre On Rahul Gandhi and Aaditya Thackery : सध्या राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. दरम्यान या गारपीटीने शेतकरी हैराण असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा सुरू होता. यावरून विरोधकांनी शिंदेंवर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अयोध्या दौरा केला अशी टीका केली.
यावरून विरोधकांना शिंदेंच्या शिवसेनेकडून शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी शिंदेंची पाठराखण करताना त्यांनी राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. या ट्विटमध्ये शीतल म्हात्रे काय म्हणाल्या? पाहुयात
शीतल म्हात्रे यांचं ट्विट :
‘राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरातला मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे नाहीत. पप्पू परदेशात जाऊन देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करतो तर पेंग्विन परराज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांची बदनामी करतोय. दोघेही एक ही थाली के चट्टे-बट्टे आहेत…’
राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरातला मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे नाहीत. पप्पू परदेशात जाऊन देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करतो तर पेंग्विन परराज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांची बदनामी करतोय. दोघेही एक ही थाली के चट्टे – बट्टे आहेत…
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 13, 2023
दरम्यान देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.
Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’
यावेळी त्यांना आदित्य ठाकरेंवर एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. तो बालिश आहे, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कोण आहे आदित्य ठाकरे, त्याला काय प्रतिष्ठा आहे. तो बालिश आहे. मला शाळेतल्या मुलांचे प्रश्न विचारु नका, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.