Download App

Sanjana Jadhav : 10 वर्षे आमदारकी माझ्यामुळे, दानवेंच्या लेकीचे विधानसभा लढवण्याचे संकेत

भाजपचे ( BJP )  ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांची कन्या संजना जाधव ( Sanjana Jadhav )  यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. संजना जाधव या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. गेल्या काही काळापासून हर्षवर्धन जाधव व संजना जाधव यांच्यात वाद सुरु आहेत. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभेचे आमदार होते.

संजना जाधव यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी केलेल्या राजकीय भाषणामुळे संजना जाधव या 2024 साली कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावेळी बोलताना त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर देखील टीका केली आहे.

आमच्या घरात जी  10 वर्षे आमदारकी होते, त्याची खरी हिरो मीच होते, असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन जाधवांवर निशाणा साधला आहे. मी मंत्र्याची मुलगी आहे, मला आमदार व्हायचे आहे, अशी माझ्यावर टीका होते. पण मी अत्यंत संयमी व्यक्ती आहे. मला पदाची अजिबात आशा नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.

(Devendra Fadanvis : राष्ट्रपती राजवट का? कुणाच्या सांगण्यावरून लागली? हेही सांगा; फडणवीसांचे पवारांना थेट चॅलेंज)

संजना जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कन्नड-सोयगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी काढलेल्या या भव्य मोर्चानंतर संजना जाधव या विधानसभा निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच या भाषणात त्यांनी ठाकरे गटाचे  विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुंबईत फ्लॅट पाहिजे या विषयावर बोलणारे नेते शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नावर विधानसभेत कधी बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आहेत. रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यानंतर आता संजना जाधव यांनी देखील विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Tags

follow us