Devendra Fadanvis : राष्ट्रपती राजवट का? कुणाच्या सांगण्यावरून लागली? हेही सांगा; फडणवीसांचे पवारांना थेट चॅलेंज

  • Written By: Published:
Devendra Fadanvis : राष्ट्रपती राजवट का? कुणाच्या सांगण्यावरून लागली? हेही सांगा; फडणवीसांचे पवारांना थेट चॅलेंज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीबाबत मौन सोडले. पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule ) उठली असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, पवारांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रश्नांची सरबत्ती करत काही गोष्टींचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.

पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबद्दल पवार साहेब बोलले, ते बरं झालं. आता माझी अजून अशी अपेक्षा आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावण्यात आली होती?, कुणाच्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागली?, त्याच्यामागे कोणती कारणं होती?, याचा खुलासा जर शरद पवारांनी केला तर अनेक कड्या जुळतील आणि मोठा खुलासा होईल. त्यामुळं आता यावर शरद पवार यांच्याकडूनच खुलासा व्हायला हवा, अशी माझी अपेक्षा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात. तर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती, असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच स्पष्ट करा, असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.

त्यावर बोलतांना पवारांनी सांगितले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. २०१९ साली सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, समजने वाले को इशारा काफी है, असं सूचक विधान पवारांनी केलं. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती.

‘जो घर नहीं संभाल सके…’; राम कदमांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी आता पवारांनी आणखी खुलासे केले तर सगळ्या गोष्टी जनतेसमोर येतील, असं सांगितलं. त्यामुळं आता पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकीय वादंग पेटताना दिसून येत आहे. त्यामुळे फडवीसांच्या प्रतिक्रियेवर आता शरद पवार काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube