Download App

संजय काकडे शरद पवार गटात जाणार? पत्नी उषा काकडेंनी घेतली खा. सुळेंची भेट…

संजय काकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती काकडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली

  • Written By: Last Updated:

Sanjay Kakade : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elecion) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Chandra Pawar party) तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत आहेत. अशाच आता माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती काकडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजना सुपरहिट, विरोधकांची तोंड काळी झालीत, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल 

संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आज (बुधवारी) पुण्यातील निसर्ग मंगलकार्यालयात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या, त्याच ठिकाणी उषा काकडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. या भेटीनंतर काकडे हे शरद पवार गटात जाणार या चर्चांना आणखीनच ऊत आला.

दरम्यान, या भेटीबाबत उषा काकडेंना विचारले असता त्यांनी आपण सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याचं सांगितलं. मी भापजला सोडचिठ्ठी देण्याच्या बातम्या नाकारात नाही किंवा त्याबाबत खात्रीशीर काहीही सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नसल्याचं काकडेंनी सांगितलं.

अहमदनगरमधील दुसरे माजी आमदार अडचणीत; सुनेच्या नावावर पिचड यांनी कोट्यावधी हडपल्याचा आरोप 

दरम्यान, याआधी संजय काकडे यांनी 10 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची भेट घेतली होतीय. तेव्हा या भेटीमुळं अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही राजकीय भेट नसल्याचं त्यावेळी संजय काकडेंनी सांगितलं होतं.

संजय काकडे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही काकडे यांच्याशी अलीकडे किमान दोन वेळा चर्चा केल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. लवकरच संजय काकडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे एका राष्ट्र्वादीच्या नेत्यानेही सांगितलं.

दरम्यान, काकडे यांनी भापजला सोडचिठ्ठी दिली तर ते कोल्हापुरातील समरजितसिंह घाटगे आणि इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे भाजपचे तिसरे महत्वाचे नेते ठरणार आहेत. हे पक्षांतर भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

 

follow us