Download App

आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखं ही वाघनखं वाटत असतील; संजय मंडलिकांचा टोला

  • Written By: Last Updated:

Sanjay Mandalik On Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला, ती वाघनखं (wagh nakh) परत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही वाघनखं परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लवकरच ही वाघनखं परत आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून उबाठाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) काही सवाल केले होते. त्यावरून आता खासदास संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वाघनख भारतात आणण्यासाठी हालचालीना वेग, करारासाठी मुनगंटीवारांचा लंडन दौरा 

वाघनखं देशात येण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात आणली जाणार वाघनखं ही छत्रपती शिवाजी शिवाजी वारपलेली आहेत की, फक्त शिवकालीन आहेत? याचा खुलासा राज्य सरकारने करावा, असं आव्हानं दिलं. तसेच ही वाघनखं किती वर्षासाठी महाराष्ट्रात आणली जात आहेत? याबाबतही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी केली. आदित्य ठाकरेंच्या मागणीला शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिलं.

काही वेळापूर्वी संजय मंडलिक यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाघनखांविषयी विचारले असता होते. त्यावेळी खासदार मंडलिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृतिचिन्हं आपल्या देशात आल्यावर शिवप्रेमींना आनंदच होणार आहे. त्यामध्ये वाघनखं असतील, महाराजांची तलवार असेल, अशा महाराजांच्या आठवणी इथे आणल्यावर आम्ही त्याचं स्वागतच करू.

आदित्य ठाकरेंनी वाघनखांविषयी केलेल्या मागणीसंदर्भात त्यांना मंडलिक यांना विचारले असता ते म्हणाले, मला त्या वादात पडायचं नाही. कदाचित आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखं ही वाघनखं वाटत असतील, णला त्यांची माहिती नाही, असा टोला मंडलिक यांनी लगावला.

तर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आदित्य ठाकरेंना टोला लगावला. आदित्य ठाकरेंना वाघनखांबद्दल काय माहिती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तीन वर्षासाठी वाघनखं महाराष्ट्रात –
सांस्कृतिक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने महाराष्ट्र सरकारला 3 वर्षांसाठी वाघ देण्याचे मान्य केले.

ही मौल्यवान शस्त्रे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

Tags

follow us