Download App

Sanjay Raut : आम्ही अजिबात गुडघे टेकणार नाही कारण जनता आमच्याबरोबर; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे.

सदानंद कदम हे शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. दापोली येथील अनिल परब यांच्या कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. यावरुन राऊतांनी घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची खेडची सभा यशस्वी करणाऱ्यांमागे सदानंद कदम हे एक होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे राऊत म्हणाले आहेत.

Hasan Mushrif यांच्या घरी पुन्हा ईडी अधिकारी, दोन महिन्यात तिसरी कारवाई

देशात सध्या विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरी देखील अशाच प्रकारे धाडी टाकल्या जात आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख मुलुंडचा पोपटलाल असा केला. ईडीने अधिकृत माहिती देण्याआधी त्याची माहिती सोमय्यांना कशी मिळते, याची चौकशी करणार का असे ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

किरीट सोमय्या यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी सरकार का करत नाही. मी स्वत: फडणवीसांकडे काही कारखान्यांची यादी देणार आहे. मग बघू सरकार त्यांच्यावर कारवाई करते का, असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशा प्रकारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्यांच्यासमोर अजिबात गुडघे टेकणार नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे, असे राऊत म्हणाल आहेत.

Tags

follow us