Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेवरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, असा टोला राऊतांनी लगावला.
Jr NTR Birthday: बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देऊन मोठा स्टार, काय आहे ती गोष्ट?
राज्यात पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, एका बाजूला मुडदे पडले असताना कार्यवाह पंतप्रधान रोड शो करतात, हे किती असंवेदनशील आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांना आम्ही रस्त्यावर उतरवलं. राज ठाकरेंनी पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, असा टोला राऊतांनी लगावला. पण, भाजपने त्यांचा पक्ष भाडेतत्वावर घेतल्याचं राऊत म्हणाले.
‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले
मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू द्यायचा नाही, असं आपण सांगत होतो. त्यांच्या पखाल्या आपण वाहता हे पाहून वाईट वाटलं, असा टोलाही राऊतांनी लगावला.
राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत
उद्धव ठाकरे पंजाला तर राज ठाकरे धनुष्यबाणाला मत देतील याविषयी विचारले असता राऊत म्हणाले, राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत आहेत. डुप्लिकेट धनुष्यबाणाला राज ठाकरे मतदान करत आहेत. तो बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण नाही. आम्ही पंजाला मत देतो, हा पंजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यात सर्वात जास्त योगदान दिले आहे. ज्या कमलाबाईंना आम्ही 25 वर्षे मतदान केले, त्यांनी देशाची वाट लावली, त्यांनी महाराष्ट्र लूटला. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो. तुम्हाला काँग्रेसचे अनेक नेते मशाली आणि तुताऱ्यावर मतदान करताना दिसतील, असेही संजय राऊत म्हणाले.
संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही
विनोद तावडेंनी काल राज ठाकरेंची भेट घेतली. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले,
राज ठाकरे यांना सुरुवातीपासूनच भेटीगाठीचे छंद जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो, कोण कोणाकडे चहापानासाठी जातो, यावर कशाला चर्चा करता. यामुळं मनसे नेत्यांना महत्व मिळतं. ते मिळू द्या. आमच्या पोटात दुखण्यचां कारण नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांना राज ठाकरे भेटतात. याची इतिहासात नोंद होईल. महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.