Sanjay Raut : स्वतःचा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणून दाखवावे, राऊतांचं शिंदेंना आव्हान

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून […]

Sanjay Raut Gudhipadva

Sanjay Raut Gudhipadva

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून तुमची ताकद दाखवू नका. असंही यावेळी राऊत म्हणाले.

तसेत पुढे बोलताना राऊत असं देखील म्हणाले की, चोरांचच सरकर आहे. खरच तुम्ही बंड केलं आहे. तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. मग कळेल खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाल्यांची शिवसेना कोणती उद्या रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासभेसाठी एक लाखाहून अधिक लोक येण्याची शक्यता आहे.

निवडणुकांपूर्वी कर्नाटकात भाजपची मोठी खेळी; मुस्लिमांचं आरक्षण दोन जातीत विभागलं</a>

या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक येथे आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या या सभेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, लोक उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रश्मी ठाकरे देखील या सभेला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेचे नेते, पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात या सभेला उपस्थित असणार आहे.

Exit mobile version