ठाकरेंनी नाव न घेताही शिंदेना जोडे का लागले? राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut On Ekanath Shinde :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविषयी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी राऊत हे भीमा पाटस कारखान्याला भेट द्यायला देखील आले होते. यानंतर राहुल कुल यांनी चौकशीला तयार असल्याचे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T110342.233

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 28T110342.233

Sanjay Raut On Ekanath Shinde :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविषयी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी राऊत हे भीमा पाटस कारखान्याला भेट द्यायला देखील आले होते. यानंतर राहुल कुल यांनी चौकशीला तयार असल्याचे म्हटले होते. यावर राऊतांनी भाष्य केले आहे.

खरगेंचे मानसिक संतुलन ढळले, मर्यादा ओलांडल्या; बावनकुळेंचा घणाघात

आमचे देखील तेच म्हणणे आहे. राहुल कुल यांची चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र दिले आहे. चौकशीची भूमिका कशा प्रकारची हवी हे ठरवायले हवे. दाद भूसे यांनी देखील 100 कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याची देखील चौकशी व्हावी. राहुल कुल यांच्या संदर्भातील कागदपत्रे मी सीबीआयकडे पाठवली आहे. कुल जर चौकशीला तयार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो, असे राऊत म्हणाले आहेत.

Dhananjay Munde : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी स्वतः कार्यकर्ता होऊन बुथवर; मुंडे यांच्या कृतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

तसेच सध्या भाजपला शिंदे गटाचे ओझे झाले आहे. ही त्यांची राजकीय अडचण आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तसेच कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ट्विटवरुन देखील त्यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बोलण्यात कुणाचेही नाव घेतले नव्हते. तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी नाव न घेताही एकनाथ शिंदेंना जोडे का लागले, असे टोला त्यांनी शिंदेंना लगावला आहे. तसेच त्यांनी तसे ट्विट पुन्हा करुन दाखवावे, असे देखील ते म्हणाले आहेत.

Exit mobile version