Dhananjay Munde : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी स्वतः कार्यकर्ता होऊन बुथवर; मुंडे यांच्या कृतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • Written By: Published:
Dhananjay Munde : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी स्वतः कार्यकर्ता होऊन बुथवर; मुंडे यांच्या कृतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

बाजार समिती निवडणुकीसाठी आज राज्यात अनेक ठिकाणी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने त्यांची राज्यभर चर्चा झाली आहे. परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज सकाळी 8 वा. सुरू झाले आणि 8 वाजून 13 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मतदान बुथवर दाखल झाले.

अचानकपणे स्वतः धनंजय मुंडे इतक्या लवकर बुथवर आलेले पाहून कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला तर अद्यापही बुथवर तातडीने पोहोचण्यासाठी लगबग सुरू झाली. ते कार्यकर्त्यांप्रमाणे बूथ बाहेरील केंद्रावर बसले. त्यांनी कार्यकर्ते व मतदारांशी संवादही साधला. मतदान प्रतिनिधीना नाव व नंबर शोधून देण्याचे कामही धनंजय मुंडे स्वतः करताना दिसून आले. अनेक मतदारांना फोनवर संपर्कही साधताना दिसले.

Market Committee Ahmednagar : मतदारांना बसमधून आणले, मविआची भाजप विरोधात घोषणाबाजी

साधारणपणे नेते मंडळी मतदानाच्या दिवशी आपल्या वेळेनुसार मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. पण धनंजय मुंडे यांच्या या कृतीने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. केवळ कार्यकर्ते, मतदार नव्हे तर विरोधी भाजपा पॅनल च्या कार्यकर्त्यांचीही त्यांनी राजकीय वैर न ठेवता मोकळेपणाने संवाद साधला.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू असुन आज धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनल मध्ये अटीतटीची निवडणूक होत आहे, आज मतदान होत आहे. मागील अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. कार्यकर्ते व मतदारांशी असलेल्या थेट संपर्कामुळे बाजार समितीसह मतदारसंघातील जवळपास सर्वच संस्थांवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सत्ता राहिलेली आहे.

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

धनंजय मुंडे हे नेहमीच प्रत्येक निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन निवडणूक लढवत असतात. दांडगा जनसंपर्क, स्वतः पूर्णवेळ प्रचारात सहभाग या सर्व बाबी कायमच धनंजय मुंडे यांच्या स्थानिक सत्तेच्या समीकरणात जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये मिसळून प्रत्येक निवडणूक आपली स्वतःची आहे असे समजून धनंजय मुंडे जे काम करतात, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांत उत्साह कायम वाढत राहतो, असेही दिसून येते.

माझ्या निवडणुकीत जे कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेऊन माझ्या विजयासाठी प्रयत्न करतात त्यांच्या निवडणुकीसाठी ही मी तितकेच प्रयत्न केले पाहिजेत म्हणूनच आज या ठिकाणी मी पूर्ण वेळ थांबणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube