Market Committee Ahmednagar : मतदारांना बसमधून आणले, मविआची भाजप विरोधात घोषणाबाजी

Untitled Design   2023 04 28T100337.992

Market Committee Election Ahmednagar : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे.

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अहमदनगर शहरातील आनंद शाळा येथे असलेल्या मतदान केंद्रावर भाजपने मतदारांना बसमधून आणल्यामुळे महाविकास आघाडीने त्याला विरोध केला. यावेळी मतदान केंद्रासमोर झालेल्या वादानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी भाजप व महाविकास आघाडीने आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास पत्रकारांसमोर व्यक्त केला.

Market Committee Election : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पाणाला

प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणले आहेत. अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र येताना पाहायला मिळाले आहे. याचा प्रत्यय आला राज्यात अनेक ठिकाणी आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.

Tags

follow us