Sanjay Raut : ‘हा’ असेल मालेगावचा पुढचा आमदार; राऊतांनी सांगूनच टाकले

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या मालेगाव येथे आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 26 तारखेला उद्या मालेगाव येथे सभा होणार आहे. याआधी राऊत हे सभेची तयारी करण्यासाठी मालेगाव येथे आलेले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी बोलताना दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. दादा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T124756.599

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 25T124756.599

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या मालेगाव येथे आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 26 तारखेला उद्या मालेगाव येथे सभा होणार आहे. याआधी राऊत हे सभेची तयारी करण्यासाठी मालेगाव येथे आलेले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

राऊत यांनी बोलताना दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. दादा भुसे हे गद्दार आहेत, ते पळुण गेलेले आहेत. यानंतर मालेगावचे आमदार हे अद्वय हिरे असतील, असे राऊत म्हणाले आहेत. अद्वय हिरे यांना राऊतांनी ठाकरे गटाचे उमेदवार घोषित करुन टाकले आहे.

Sanjay Raut : राऊतांवरील हक्कभंगात नवा ट्विस्ट ; प्रकरण जाणार केंद्राच्या दरबारी

काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मालेगाव येथे सभेसाठी येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली होती. त्यानंतर आता ते मालेगाव येथे सभेला संबोधित करणार आहेत.

बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीने लावले बॅनर

उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, असे राऊत म्हणाल आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे असा सामना पहायला मिळेल. दादा भुसे हे सध्या राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जी सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. मालेगाव येथे उद्धव ठाकरे  हे राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे. राज गुढीपाडव्याच्या सभेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.

Exit mobile version