बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीने लावले बॅनर
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभासचिवालयाने रद्द केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे लोक चोर असल्याचे विधान केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात गुजरात मधील एका मोदी आडनावाच्या माणसाने त्यांच्या विरोधात सुरत जिल्ह्या न्यायालयात गुन्हा दाखल केला. आज चार वर्षा नंतर सुरत न्यायलयाने राहुल गांधी यांना दोषी मानत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे राहुल गांधींची खासदारकी ही रद्द करण्यात आली.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमठू लागले आहे. प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील धडाडीचे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. पुण्यातील पाषाण रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. बच्चू कडू यांना देखील दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
Sanjay Raut : राऊतांवरील हक्कभंगात नवा ट्विस्ट ; प्रकरण जाणार केंद्राच्या दरबारी
या सर्व प्रकरणावर बच्चू कडू म्हणतात हे पोस्टर यांनी अज्ञापणातून लावले आहेत यांना नेमकं खरं काय आहे हे माहित नाही. काल बच्चू कडू लेट्सअप बोलताना म्हणाले होते की माझा आणि राहुल गांधी यांच्या प्रकरणात भिन्नता आहे. राहुल गांधी यांना एकाच प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली. म्हणून त्यांची खासदारकी गेली तर मला दोन वेगवेगळ्या प्रकरणात एक -एक अशी दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे माझी आमदारकी जाण्याचा प्रश्नच येत नाही असे बच्चू कडू म्हणतात. ही लक्षण सगळी अज्ञानपणाची आहेत.