Sanjay Raut : राऊतांवरील हक्कभंगात नवा ट्विस्ट ; प्रकरण जाणार केंद्राच्या दरबारी

Sanjay Raut : राऊतांवरील हक्कभंगात नवा ट्विस्ट ; प्रकरण जाणार केंद्राच्या दरबारी

Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेतील हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत जाणार आहे. आजच हे प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार असून या प्रकरणी राज्यसभेचे मत विचारात घेण्यात येणार असल्याचे समजते.

हे वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य..

याआधी राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसीला राऊत यांनी उत्तरही दिले होते. विधानमंडळ सचिवांना त्यांनी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतला होता. समिती तटस्थ असावी. समितीत जे सदस्य घेतले आहेत ते माझे राजकीय विरोधक आहेत असे राऊत यांनी या पत्रात म्हटले होते.

मी जे चाळीस चोर असल्याचे वक्तव्य केलेले होते ते एका संबंधीत व्यक्तींपुरते मर्यादित होते, असे म्हणत त्यांनी पत्रामध्ये शिंदे गटाचा उल्लेख टाळला आहे. मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्या विपर्यास करण्यात आला.  आपण ते वक्तव्य पुन्हा ऐकावे व त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रात म्हटले होते. त्यानंतर आता हे प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठविण्यात आले आहे.

Sanjay Raut : राऊत यांच्यावर हक्कभंग, विधिमंडळात समितीची बैठक; राज्यसभेला पत्र पाठवलं जाणार?

राऊतांचे वक्तव्य काय

काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे कोल्हापूर येथे होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला होता. त्याठिकाणी चाळीस चोर आहेत, असे ते म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष शेलार, अतुल भातखळकर तसेस शिंदे गटाचे विधानसभेचे प्रतोद भरत गोगावले हे आक्रमक झाले होते. त्यांनी राऊतांवर हक्कभंग आणावा याची मागणी केली होती.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube