Download App

आम्हाला विरोधी पक्ष नाही तर देशभक्त म्हणा…; राऊतांचा माध्यमांना सल्ला

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On PM Modi :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात सध्या महागाई वाढली असून त्यावर कोणी बोलायला तयार नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; राम शिंदे म्हणाले, प्रथा, परंपरा…

भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहे. आपचे अरविंद केजरीवाल, जनता दलाचे नितीश कुमार, राष्ट्रवादीचे शरद पवार तर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी बैठका घेण्यात येणार आहे, असे राऊत म्हणाले. तसेच आम्हाला विरोधी पक्ष न म्हणता देशभक्त म्हणा, असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट

बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधी पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहे. याबाबत पत्रकारांनी राऊतांना उद्धव ठाकरे हे या बैठकीत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, आम्ही त्याला विरोधी पक्ष म्हणत नाही. देशभक्त म्हणतो. या देशावर हुकुमशाहीचं संकट येतंय. देशात लोकशाही, संविधानविरोधी काम सुरु आहे. त्यामुळे मोदींविरोधात देशभक्त एकत्र येत आहे, असे राऊत म्हणाले.

 

 

Tags

follow us