Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वळवाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये आता राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. मात्र काही ठिकाणी अद्याप देखील उकाड्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यातच अवकाळी पावसानंतर राज्यात उष्णतेची लाट देखील आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा मान्सूपूर्व पाऊस राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Medical Colleges : केंद्रसरकारची मोठी कारवाई, 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राङणार असल्याची शक्याता वर्तवली आहे. तर दुसरीकडे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उद्या 1 जूनलादक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामानाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यावेळी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आकाश निरभ्र राहून सूर्यप्रकाशाची शक्यता आहे.