Sanjay Raut : ‘विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची. असे सत्र सध्या भाजपच्या (BJP ) लोकांनी आरंभलेलं आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखाली बाहेर पडणार नाही. तसेच या कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणावरून त्यांनी भाजपवर सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं? या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही?’ असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला. ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
‘ग्राहकांचेच हित जपायचे असेल तर कांद्याला अनुदान द्या’; कांदाप्रश्नी थोरातांचा मोदी सरकारवर संताप
काय म्हणाले संजय राऊत?
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. त्याचबरोबर इंडिया अलायन्सच्या 31 आणि 1 तारीख संदर्भातल्या तयारीला वेग आलेला आहे. या देशातील देशभक्त पक्ष या आघाडीमध्ये एकत्र आले आहेत. भाजप (BJP ) विरोधकांवर ज्या प्रकारची कार्यवाही सुरू आहे. आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची. असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मात्र कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखालून बाहेर पडणार नाही. भाजपाच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राचे पोलीस ज्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत, त्यांनी पहिलं कायद्याचं वाचन करावं. 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावं. असं म्हणात राऊतांनी (Sanjay Raut ) भाजपवर (BJP ) निशाणा साधला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणावर राऊत म्हणाले…
तर पुढे फोन टॅपिंग प्रकरणावरून त्यांनी भाजपवर (BJP ) सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं? या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? तसेच आय एन एस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारे निकाल एक प्रकरण बाहेर काढलं का चौकशी होत नाही? आज आम्ही जात्यात आहोत तुम्ही सुपात आहात, 2024 नंतर हे सगळं उलट होईल. तर बावनकुळेंच्या बाबत विचाारले असता चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? माहित नाही मला. असं उत्तर राऊत यांनी दिलं.