Download App

Sanjay Raut : बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर खुलासे करणाऱ्या दानवेंचं मन का खातंय? राऊतांचा टोला

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर दानवे आणि इतर लोक खुलासे का करत आहात तुमचं मन का खातंय’ ते आज पत्रकाीर परिषदेत बोलत होते.

बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावरून दानवेंना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा कथिक फोटो खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केला होता. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात विरोधकांकडून बावनकुळेंवर जोरदार टीका करण्यात आली. तर सत्ताधारी आणि भाजप नेत्यांनी बावनकुळेंच्या दौऱ्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर राऊतांनी बावनकुळेंची पाठराखण करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे.

Club 52 Teaser: ‘तुझ्या पिसलेल्या पत्त्यात तुझाच डाव उधळणार’, ‘क्लब 52 ‘चा धमाकेदार टीझर रिलीज

राऊत म्हणाले की, मकाऊ एक सुंदर शहर आहे संपर्ण जग आकर्षित झाले आहे. लपवता कशाला आहे. उडवले असतील बावनकुळेंनी पैसे तिथे त्यांच्याकडे खोके आहेत. पण दानवे आणि इतर लोक खुलासे का करत आहात तुमचं मन का खातंय? असा सवाल करत संजय राऊतांनी दानवे यांना देखील अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

राज्यव्यापी दौरा, 57 गाड्या, शेकडो कार्यकर्ते; जरांगेंच्या अवाढव्य दौऱ्याचा अफाट खर्च कोण करतं?

काय आहे प्रकरण?

19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज