Sanjay Raut : हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं; नॅशनल हेराल्डवरून राऊतांची टीका

Sanjay Raut : हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं; नॅशनल हेराल्डवरून राऊतांची टीका

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी झालेल्या नॅशनल हेराल्डवरील कारवाईवरून भाजपवर टीका केली आहे. यावेळी राऊत म्हणाले की, हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलेलं आहे. तर आमची ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे. आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत. ते आज पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही टीका केली.

हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं…

नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपासा प्रकरणी ईडीकडून ही कारावाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले की, नॅशनल हेराल्ड वरती अचानक काल कार्यवाही झाली. पंडित नेहरूंनी स्थापन केलेलं ते ऐतिहासिक वृत्तपत्र आहे. नॅशनल हेराल्ड हळूहळू स्पर्धेत मागे पडलं असेल हेराल्ड जगविण्यासाठी काही व्यवहार झाले.

‘2 मिनिटाच्या सीनसाठी किंग खानने घालवलेत तब्बल 6 तास; ‘डंकी’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला

पण या देशात मोदी, शाह यांच्या विरोधातील लोकांच्या चौकशी होतात. आमची ही झाली. मात्र जे भाजपात गेले, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली नाही. हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलेलं आहे. आमची ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे. आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत. असं म्हणत राऊतांनी भाजपवर खडसून टीका केली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?

स्वातंत्र्यपूर्व काळात नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची स्थापना झाली होती. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयातून नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी नवजीवन हे हिंदी व कौमी आवाज हे उर्दू दैनिक प्रसिद्ध होत असे. त्यांचा काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असूनही संपादक एम. चलपती राव यांनी आपला स्वतंत्र बाणा जोपासला होता.

ICC : ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंसाठी बॅड न्यूज! आंततराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी असताना काँग्रेस पक्षाचा पैसा नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करणारी कंपनी विकत घेण्यासाठी वापरला असा दोघांवरही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपचे नेते सुब्रह्मण्याम स्वामी यांनी पहिल्यांदा 2012 मध्ये आरोप केले होते. तर गांधी कुटुंबियांनी कायम कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अफरातफरीचे आरोप फेटाळले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube